Pimpri : गणेशोत्सवानिमित्त मूर्ती विसर्जन हौद; मूर्ती संकलन केंद्र

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी (Pimpri) येथे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने कृत्रिम मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्राचे 19 सप्टेंबर 2023 ते गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 आयोजन करण्यात आले आहे.

याविषयी माहिती देताना वाघेरे म्हणाले, की नदीपात्रामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात येत असते. त्यामुळे नागरिकांच्या भावनेचा विचार करत पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व नागरिकांसाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी जनसंपर्क कार्यालय समोरील जागेमध्ये कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी 30×100 आकाराचा मंडप उभारण्यात आला आहे. सहा मीटर लांबीचे शुद्ध पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आलेले आहे.

Pimpri : विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात असणार

तसेच लोकभावनेचा आदर करीत केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या (Pimpri) गणेश मूर्ती मोशी येथे महापालिकेने ठरवून दिलेल्या खाणी मध्ये वाहतूक करून विसर्जित केल्या जाणार आहेत. मागील वर्षी केंद्रामध्ये 5000पेक्षा जास्त मूर्ती विसर्जित व संकलित झाल्या होत्या.

सदर केंद्राचा नागरिकांनी सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. तसेच विसर्जन केंद्रावर येताना नागरिकांनी सर्व शासकीय तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, तसेच अधिक माहितीसाठी गणेश मंजाळ 7972298053 व रंजनाताई जाधव 9766487236 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.