Pimpri : महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी कसोशीने प्रत्येकाने प्रयत्न करा – गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज- भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांना जिंकून आणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी तुम्हां सर्वांची मदत हवीय. त्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करा, असे मत आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.

मावळ लोकसभा 2019 सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी वाघेरे येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्राधिकरण समितीचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, वैशाली खाड्ये, रोमी संधू, राजेश पिल्ले, कोमल काळभोर, कैलास कुटे नगरसेवक माऊली थोरात,, नगरसेवक संदीप वाघेरे आदी उपस्थित होते.

गौतम चाबुकस्वार म्हणाले , “शहरातील विकासाची अनेक काे मार्गी लागत आहे. ही विकासाची गंगा प्रवाह असाच चालू ठेवायचा असेल तर आपल्याला मोदींशिवाय पर्याय नाही.देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. त्यामुळे देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे”

उद्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली पिंपरीतून निघणार आहे, हजारोंनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सदाशिव खाडे म्हणाले, “अब की बार मोदी सरकार असा विश्वास मनांत ठेवून धनुष्यबाणाला मत दया. तसेच श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मतदारांनी द्यावी. बारामतीचे पार्सल पुन्हा इथे आणू नये असा टोला ही त्यांनी लगावला. आपल्या समोरचा हा विरोधक नवीन आहे. पुन्हा त्यांची सत्ता येता कामा नये. अगोदर आजोबा नंतर वडील आणि आता मुलगा या गोतावळ्यात पुढची पिढी मावळमध्ये येता कामा नये”

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “पुन्हा एकदा लोकसभेत श्रीरंग बारणेंना पाठविण्याचा ठाम आहे. चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेले श्रीरंग बारणे यांना परत पुढील वर्षी संससपटू पुरस्कार मिळण्यासाठी आपण सर्वांनी धनुष्यबाणाला मत द्यावे”

शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, “ही निवडणुक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांने श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल याची जबाबदारी घ्यायची आहे. प्रत्येक बुथ कमिटीच्या सदस्याने होम टू होम फिरुन आप्पांचा प्रचार करायचा आहे. येणा-या काळात धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस सुट्टी असून प्रत्येकाने मतदारांना बाहेर जाण्यासाठी रोखले पाहिजे. आधी मतदान करा व नंतर बाहेर पडा असे सांगा. जिथे जिथे आमची मदत लागेल तिथे तिथे आम्ही मदत करायला तयार आहोत”

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, श्रीरंग बारणे यांना माझ्या प्रभागांतून 70 टक्के मतदान त्यांना होईल. ही जबाबदारी माझी राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.