एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे आमदार सुनील शंकरराव शेळके युवा मंचच्या वतीने रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे, भाजप मावळ तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काटे, सोनवने, नगराध्यक्षा चिञा जगनाडे, भाजपचे तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक अरुण भेगडे व सुधाकर शेळके आदी उपस्थित होते.