Moshi: ‘कोट्यवधी खर्च करुनही कचरा समस्येचा बोजवारा’ ; भूगोल फौंडेशनचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. कचरा गोळ्या करणा-या गाड्यांची उंची जास्त असून महिलांना कचरा टाकता येत नाही. सर्वत्र कचरा दिसून येतो. पूर्वी स्मार्ट असलेले शहर आता बकाल होत जात असल्याचा आरोप भूगोल फौंडेशनचे विठ्ठल वाळुंज यांनी केला.

मोशी, संतनगर सेक्टर चारमधील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. रस्ते साफ केले जात नाहीत. कचरा कुठेही पडलेला असतो. कच-याची समस्या गहण झाली आहे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. गाड्या खरेदीवर कोट्यवधी खर्च केला. परंतु, कचरा गाड्यांची उंची मोठी आहे. त्यामुळे महिलांना गाडीत कचरा टाकता येत नाही. हात पुरत नाही. परिणामी, काही कचरा खाली पडतो.

गाडीमध्ये ओला आणि सुका कच-यासाठी दोन वेगवेगळे ‘कप्पे’ केले आहेत. परंतु, कचरा वेगळा करुन घेतला जात नाही. ओला, सुका कचरा एकत्रच टाकला जातो. त्यामुळे कच-याचे विलगीकरण होत नाही. कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. शहर पूर्वी स्मार्ट होते, आता बकाल होत चालले आहे असे वाटते. कचरा कुठेही पडलेला असतो. नियमितपणे उचलला जात नाही, असे वाळूंज यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.