Pimpri : सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी -संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे कि, सध्या पाणी टंचाईची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे निसर्ग स्त्रोतांचे बचत करणे आवश्यक आहे. यासाठी सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

  • यापूर्वी वसई-विरार महानगरपालिकेनेही हे प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. त्यानंतर त्यांनी तेथील नागरिकांच्या मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही असे प्रकल्प राबविणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करात सवलत द्यावी, असा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतल्यास असे प्रकल्प राबविण्यासाठी नागरिक पुढे येतील.

त्यामुळे शहरात पाणी टंचाई, भारनियमन आदी समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. त्यामुळे असे सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्यां नागरिकांना मालमत्ता करात सवलत द्यावी. याची अमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.