Pimpri : उद्योगनगरीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना विविध संस्था आणि संघटना यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. भाजयुमो पिंपरी चिंचवड शहरा तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी भाजयुमोचे दीपक नागरगोजे, अजित कुलथे, तेजस्वीनी कदम, राहुल शिंदे, सचिन राऊत, भागवत मुंडे, अमोल दामले, मनोज पाटील, अमित देशमुख, शुभम दुबळे, तनया लोहकरे, संगीता जगदाळे, अविनाश काळे, सुशांत भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  • रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

  • यावेळी विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

“आपल्या झुंजार लेखणीद्वारे सर्जनशील आणि सत्यान्वेशी लेखण करून महाराष्ट्राला प्रभावित करणारे साहित्यसम्राट लोकशाही अण्णा भाऊ साठे, साम्यवादी विचारसरणीचे होते. चळवळीत काम करतानाच त्यांचा शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्याशी परिचय झाला. तत्वातर यांच्यासोबत राहून अण्णा भाऊ साठे यांनी लालबावटा कलापथकाची मुंबईत स्थापना केली.”

  • लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते शिक्षक, समाजसुधारक आणि आणि वकीलसुध्दा होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती, असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सागितले. चारुशीला पगार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद चांदमारे, अॅड. दिपक ओव्हाळ, सतीश कसबे, विलास गरड, प्रा. सुमीत चांदमारे, शेषेराव सूर्यवंशी, नारायण वानखेडे, नवनाथ मरके, बाबासाहेब कांबळे, पंढरी खिलारे, प्रकाश साळवे, मधुकर धोंगडे, अंकुश सरवदे, बलभिम सोनकांबळे, आत्माराम सोनकांबळे, सोपान खंदारे आदी उपस्थित होते.

  • साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास तसेच महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसदस्य राहूल भोसले, समीर मासुळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मुख्य लिपीक रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

  • निगडी येथे झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे. नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, सुमन पवळे, प्रियंका बारसे, नगरसदस्य उत्तम केंदळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष सतिश भवाळ, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, दरम्यान साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात यमुनानगरचे.टी.बी. युनिट यांनी आयोजित केलेल्या क्षयरोग निदान शिबिराचे उद्‌घाटनही महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झाले.

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी भक्ती-शक्ती चौकातील आण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, भाऊसाहेब अडागळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, सुंदर कांबळे, लक्ष्मण रुपनर, परशूराम गुंजाळ, विशाल कसबे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, गौरव चौधरी, दीपक जाधव, आशा शहाणे, शीतल कोतवाल, रमजान अत्तार आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.