Talegaon : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी दीपक झिंझाड रुजू
एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून दीपक झिंझाड यांनी शुक्रवारी (दि.२०) पदभार स्वीकारला. झिंझाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सेवेत होते.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने झिंझाड यांना पदग्रहण अवधी न उपभोगता तात्काळ रुजू होण्याचे आदेश शुक्रवारी (दि.२०) दिले.
शुक्रवारी सायंकाळी झिंझाड यांनी येथील मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची २३ जुलै रोजी
बदली अकोले महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर झाल्याने हे पद रिक्त होते. सचिन पवार यांच्याकडे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा
मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आला असल्याने त्यांच्यावर कामाच्या मर्यादा पडत होत्या. नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. आता हा त्रास कमी होणार आहे.