Pune : विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी
एमपीसी न्यूज – विद्युत खांबावर काम करताना एका महावितरणच्या कर्मचा-याला शॉक लागल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गंगाधाम चौकापुढे साळवे गार्डन जवळ सकाळी घडली.
दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी कर्मचा-याला खाली आणून रुग्णालयात रवाना केले. या कर्मचा-यावर उपचार सुरू असून अद्याप त्याचे नाव समजले नाही. त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.