Chichwad : राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि.) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

विलास आप्पासाहेब जगताप (वय 55, रा.विद्यानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना त्यांच्या मुलगा कृष्णा जगताप यांनी पाहिल्यावर त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.