Bhosari : गांजा बाळगणारा जेरबंद
एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला. ही कारवाई भोसरी येथे केली.
राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय 49, रा. माजलगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र देवराम बांबळे (वय-42) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 हजार 700 रूपयांचा 390 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.