Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास थेरगाव येथे घडली.
सनी शरद औसरमल (वय 28, रा. अशोकनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेंद्र राजाराम विटकर (वय 54, रा. थेरगाव) याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी थेरगाव येथून दुचाकीवर जात होते. यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून जुन्या भांडणांच्या रागातून त्यांना हाताने तसेच दगडाने मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.