Vadgaon Maval: अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची भाजपची मागणी
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व किराणा, भाजी, फळे, गॅस, औषधे आदी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विक्रेत्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी याबाबत वडगाव शहर भारतीय जनता पार्टी, तसेच युवा मोर्चा, व्यापारी आघाडी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत वडगाव नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष किरण भिलारे , व्यापारी आघाडी अध्यक्ष भूषण मुथा, सचिव रवींद्र म्हाळसकर, शंकर भोंडवे, विराज हिंगे आदी उपस्थित होते.