Pimpri: युवकांना कोरोनाचा धोका, आजपर्यंत 45 जणांना लागण; कोरोनाबाधितांमध्ये शहरातील युवकांचा सर्वाधिक आकडा
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. आजपर्यंत 45 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याखालोखाल 40 वर्षापुढील 23 जणांना, 13 वर्षापुढील 16, 11 लहान मुलांना आणि 60 वर्षापुढील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आजपर्यंत 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांमध्ये आहे. याबाबतच्या सविस्तर माहितीचा नकाशा महापालिकेने प्रसिद्ध केला आहे.
22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 45 युवकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 23 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 16 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 11 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.