Mumbai : कॅमेरा कॉन्शस करिश्मा आणि मस्तीखोर करीनाचा फोटो व्हायरल
एमपीसी न्यूज : लोलो आणि बेबो म्हणजे कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. अहो आपल्या कपूर सिस्टर्स…करिश्माला म्हणतात लोलो आणि करीनाला म्हणतात बेबो. तसं कपूरांकडे प्रत्येकाचे निकनेम आहेच. रणधीर म्हणजे डब्बू तर ऋषी म्हणजे चिंटू. त्याच धर्तीवर करिश्मा आणि करीना म्हणजे लोलो आणि बेबो. सध्या करीना कपूरच्या एका फॅन पेजवर या दोघींच्या लहानपणीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. सध्या या दोघींचा फोटो चाहत्यांना आवडत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.
या फोटोमध्ये दोघी बहिणी अत्यंत गोड दिसत असून करीना तिच्याच मस्तीमध्ये दंग असल्याचं दिसून येत आहे. तर करिष्मा मात्र फोटोमध्ये पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजवर बॉलिवूडमध्ये बहिणींच्या अनेक जोड्या चर्चेत आल्या. जुन्या जमान्यात नूतन-तनुजा, मुमताज – मल्लिका, रागिणी – पद्मिनी, डिंपल – सिंपल. नव्या युगात ट्विंकल – रिंकी खन्ना, काजोल -तनिषा, शिल्पा – शमिता, शिल्पा – नम्रता शिरोडकर इत्यादी.
मात्र, या सर्वांत जास्त चर्चिली जाणारी बहिणींची जोडी म्हणजे करिष्मा आणि करीना कपूर यांची. जिम असो, पार्टी असो किंवा कुठलाही कार्यक्रम अनेकदा लोलो आणि बेबो या दोघींनी माध्यमांची लक्ष वेधली आहेत. सध्या या दोघींच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रत्येकालाच त्याचं बालपण प्रिय असतं. त्यामुळे आजही अनेक जणांकडे त्यांच्या लहानपणीचे फोटो, व्हिडीओ अशा अनेक साधनांच्या माध्यमातून जपून ठेवलेल्या आठवणी असतात. सेलिब्रिटीदेखील यापेक्षा वेगळे नसतात. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लहानपणीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
यामध्ये कपूर सिस्टर्सचा देखील समावेश आहे. या दोघी बहिणींनी त्यांच्या लहानपणीचे बरेचसे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, या साऱ्यामध्ये त्यांचा अगदी लहान असतानाचा एक फोटो लक्ष वेधत आहे.
करीना कपूरच्या एका फॅन पेजवर या दोघींच्या लहानपणीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दोघी बहिणी अत्यंत गोड दिसत असून करीना तिच्याच मस्तीमध्ये दंग असल्याचं दिसून येत आहे. तर करिष्मा मात्र फोटोमध्ये पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या दोघींचा फोटो चाहत्यांना आवडत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.