Samudra Setu Campaign: आयएनएस जलाश्वने इराणमधील 687 भारतीय नागरिक मायदेशी

Samudra Setu Campaign: INS Jalashwa brings back 687 stranded Indians from Iran भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.

एमपीसी न्यूज- भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आयएनएस जलाश्वने बुधवारी (दि.1) इराणमधील 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्‍यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले हे जहाज 1 जुलै रोजी सकाळी तुतिकोरीन बंदरामध्ये दाखल झाले. भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना मायदेशी आणले आहे.

इराणमधील भारतीय मिशनच्यावतीने भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यासंबंधीची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. जलप्रवासाला जाण्यापूर्वी सर्वांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

तसेच कोविड-19चा होत असलेला प्रसार लक्षात घेत शारीरिक अंतर राखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

तुतिकोरीन बंदरातल्या स्थानिक अधिकारी वर्गाने आलेल्या प्रवाशांची स्थानांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून, आरोग्य तपासणीनंतर त्यांच्या मूळ स्थानी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली.

संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 चा प्रसार झाला आहे. अनेक नागरिक विविध देशात अडकून पडले आहेत. जे नागरिक मायदेशी येवू इच्छितात अशा 3 हजार 992 भारतीय नागरिकांना नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत मायदेशी आणण्यात आले आहे. महामारीच्या काळामध्ये हे भारतीय नागरिक मालदिव, श्रीलंका आणि इराणमध्ये वास्तव्य करीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.