GST Collection : मार्चमध्ये जीएसटी संकलन 1.78 लाख कोटींच्या घरात!

एमपीसी न्यूज – मार्चमध्ये पुन्हा एकदा जोरदार जीएसटी संकलन झाले आहे. केंद्र  सरकारकडून जीएसटी संकलनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चमध्ये जीएसटी संकलन 11.5% ने वाढून 1.78 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने  जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जीएसटी संकलनात ही वाढ देशातील व्यवहारांमध्ये 17.6% वाढ झाल्यामुळे झाली आहे.

मार्चमधील जीएसटी संकलनाचे आकडे खालीलप्रमाणे-

  • केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): रु. 34,532 कोटी
  • राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): रु. 43,746 कोटी
  • एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): रु. 87,947 कोटी (आयात केलेल्या वस्तूंमधून गोळा केलेल्या रु. 40,322 कोटींसह)

GST संकलनाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 9 महिन्यांच्या सरासरीपेक्षा यावेळी जीएसटी संकलन अधिक झाले असून हा एक नवीन विक्रम (GST Collection) आहे.

एका महिन्यात सर्वाधिक GST संकलनाचा विक्रम एप्रिल 2023 च्या नावावर आहे, जेव्हा हा आकडा 1.87 लाख कोटी (GST Collection) रुपयांच्या उंचीवर पोहोचला होता. एकंदर ह्या सर्व आकड्यांचा विचार करता हे दुसरे सर्वात मोठे GST संकलन आहे.

गेल्या सहा महिन्यातील GST संकलन पुढीलप्रमाणे-

ऑक्टोबर, 2023 =  1.72  लाख कोटी

नोव्हेंबर, 2023 – 1.67 लाख कोटी

डिसेंबर 2023 –  1.65 लाख कोटी

जानेवारी 2024- 1.72 लाख कोटी

फेब्रुवारी, 2024- 1.68  लाख कोटी

मार्च, 2024- 1.78 लाख कोटी

LokSabha Elections 2024 : भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

भारत सरकारने जुनी अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून 1 जुलै 2017 रोजी देशभरात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला.  स्वातंत्र्य मिळाल्यापासून करप्रणालीमध्ये केलेला हा सर्वात मोठा बदल होय. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयचे म्हणणे आहे की, सहा वर्षांपूर्वी लागू केलेल्या या नव्या करप्रणालीमुळे भारतीय नागरिकांच्या करावरील बोजा कमी होण्यास खूप मदत होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.