Khed news: सुरेश गोरे यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने कार्यशील नेतृत्व गमावले – अजित पवार
एमपीसी न्यूज – पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आमचे सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार, सन्माननीय सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गोरे सध्या शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ जुळलेले होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळं नातं होतं. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत.
आज आम्ही आमचा जूना सहकारी, पुणे जिल्ह्यानं एक कार्यशील नेतृत्वं गमावलं आहे. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो ही प्रार्थना, असे अजित पवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.