Thergaon News : वाल्मिकी समाजाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद; 46 बाटल्या रक्त संकलन

एमपीसीन्यूज : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून बाल्मिकी समाज पंचायत थेरगाव, वाल्मिकी समाज संस्था महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी सिरॅालॅाजिक इन्स्टिट्यूट ब्लड बॅंक, खराळवाडी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 46 दात्यांनी रक्तदान केले.

सध्या कोरोना संकटामुळे आणि विविध गैरसमजामुळे नागरिकांनी रक्तदानाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी शहरात रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सध्याच्या परिस्थितीत इतर आजार, शस्त्रक्रिया आणि डायलिसिस करिता रक्ताची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर बाल्मिकी समाज पंचायत,थेरगाव यांच्यावतीने थेरगावातील कैलास मंगल कार्यालयात आज, शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 46 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानात सहभाग घेतलेल्या दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नगरसेवक कैलास बारणे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

पिंपरी सिरॅालॅाजिक इन्स्टिट्यूट ब्लड बॅंकेचे डॉ. ए. बी. पाटील, तंत्रज्ञ मंगेश सुरवसे, राणी मुंडे, सुनीता ज्वेलवाड यांनी रक्तदानासाठी मेहनत घेतली.

वाल्मिकी समाज पंचायतचे अध्यक्ष सुरेश घुसर, उपाध्यक्ष ओमप्रकाश खोकर, सचिव मुन्ना लोट, योगेश रेनवाल, उपसचिव विक्रम खैराले, रामदास आदिवाल, खजिनदार अशोक लोट, बाबुलाल चावरीया, सदस्य जगदीश खोकर, पप्पुलाल खोकर, सुनिल लोट, विशाल लखन, निलेश घुसर, गोरु लखन, मुकेश गोयर आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.