Dehuroad Crime News : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

सोमनाथ जयवंत पडवळ (वय 30, रा. महागाव, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत साईनाथ जयवंत पडवळ (वय 34, रा. डांगे चौक, ताथवडे गाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक छोटेलाल रवींद्र प्रसाद (वय 23, रा. नाशिक फाटा कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईनाथ यांचा मयत भाऊ सोमनाथ शनिवारी सकाळी साडेआठ वाजता दुचाकीवरून (एम एच 14 / बी एच 8472) कामावर जात होता.

सेन्ट्रल चौक, देहूरोड येथे आल्यानंतर एका कंटेनरने (एम एच 12 / एल टी 7402) सोमनाथ याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सोमनाथ गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.