Wakad Crime News : थेरगावात दुकानदारास दगडाने मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एका दुकानदारास तीन जणांनी दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना जय मल्हार नगर, थेरगाव येथे गुरुवारी (दि. 12) रात्री घडली.

मेहबूब पटेल, स्वप्नील सागर आणि अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सूर्यकांत मोगलय्या गुत्तेदार (वय 32, रा. कैलासनगर, थेरगाव) यांनी शुक्रवारी (दि. 13) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी सूर्यकांत हे त्यांच्या दुकानाच्या जवळ असलेल्या चायनीजच्या दुकानात थांबले होते. त्यावेळी तीन आरोपी तिथे आले. त्यांनी शिवीगाळ करीत तुला दुकान बंद करायचे नाही का, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी सूर्यकांत यांनी शिव्या का देता, अशी विचारणा केली. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून जबर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.