Pimpri News : घरगुती पोळीभाजी चालकांना अधिकृत परवाना मिळणार,

एफडीए'च्या निर्णयाचे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वागत 

एमपीसी न्यूजघरगुती पोळीभाजी, स्नॅक सेन्टर चालकांना आता अधिकृत परवाना मिळणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनच्या (एफडीए) या निर्णयाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. यामुळे घरगुती पोळीभाजी स्नॅक सेन्टर चालकांना शासनदरबारी अधिकृत व्यवसायाचा दर्जा मिळणार असल्याचे कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी म्हंटले आहे.

लॉकडाउन’च्या काळात अनेकांची नोकऱी गेली तर, काहींचे व्यवसाय बुडाले. याच काळात शहरात अनेकांनी घरातून जेवण, नाष्टा वितरण आणि विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायिकांना आता अधिकृत परवाना मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने हा परवाना मिळणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन’च्या (एफडीए) या निर्णयाचे व्यवसायिकांनी स्वागत केले आहे.

सरकार आणि महापालिकेने घरगुती जेवण आणि स्नॅक सेवा देणाऱ्या व्यवसायिकांना त्वरित विशेष आपत्कालीन सेवेचा दर्जा द्यावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.