Pune Crime News : चुकीच्या दिशेने वाहन चालवून चौघांना जखमी केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – चुकीच्या दिशेने वाहन चालवत दुचाकीसह मोटारीला धडक देऊन चौघांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी पुलानजीक घडली.

अभिषेक संजय नाफडे (वय 35, रा. विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी संपत भोगे (वय 34 रा. दत्तनगर, आंबेगाव खुर्द) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप तपेश्वर भगत (रा. वडगाव शेरी, अबु बखर शेख रा. येवलेवाडी,) अशोक झरनाप्पा पापनूर (रा. विमाननगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास अभिषेक मोटारीतून जात होता. त्यावेळी त्याने कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी पूलावरून मोटार विरुद्ध दिशेने चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे समोरून आलेल्या संपत यांच्या मोटारीला धडक दिल्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर अभिषेकने इतर वाहनांना धडक दिल्यामुळे तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.