Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, दिघी, वाकड, सांगवी, हिंजवडी आणि भोसरी परिसरातून तब्बल नऊ दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी रविवारी (दि.13) पोलीस दप्तरी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शहरात वाहन चोरीचे प्रकार वाढत आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात कुमार विलास माने (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी त्यांची 70 हजारांची पल्सर दुचाकी तर नारायणदास गुरुमुखदास भागवाणी (वय 62, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) यांनी 25 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे.

तुषार महादेव मांगलकर (वय 25, रा. रामटेकडी, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 25 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दीपक लक्ष्मण लोंढे (वय 26, रा. काळेवाडी गावठाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सोमनाथ महादेव राऊत (वय 26, रा. पिंपळे गुरव) यांची 10 हजारांची दुचाकी, पांडुरंग श्रीधरराव मोकाशे (वय 34, रा. पिंपळे सौदागर) यांची आठ हजारांची दुचाकी आणि निहाल रवींद्र फाये (वय 24, रा. नवी सांगवी) यांची 25 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात बाबासाहेब रामचंद्र पावसकर (वय 48, रा. वानवडी, पुणे) यांनी 15 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे. तर सिद्धेश्वर शरद गाडेकर (वय 26, रा. मोशी) यांनी 10 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरात वाहनचोरीचे प्रकार वाढत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत 847 वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील अत्यल्प वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.