Tabbu’s Insta Account : तब्बूचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक
एमपीसी न्यूज: प्रसिद्ध सेलिब्रेटी असलेल्या व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरील अकाउंट्बरोबर छेडछाड होत असते. यांत आता अभिनेत्री तब्बूचेही इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. तब्बूने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
पूर्वी ईशा देओल, फराह खान, श्रुती हसन, करण जोहर, अनुपम खेर हेदेखील अशा सायबर हल्ल्याचे शिकार ठरले आहेत. तब्बूने तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीत ‘हॅक अलर्ट. माझे अकाऊंट हॅक झाले आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका’ असा संदेश टाकला आहे. अकाऊंट हॅक झाले असले, तरी तब्बू संदेश शेअर करू शकत आहे. तब्बूचे इन्स्टाग्रामवर 1.9 एम फॉलोवर्स आहेत.
याआगोदर सुष्मिता सेनने तिच्या मुलीचे अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिचे अकाऊंट रिकव्हर करण्यात आले होते.