Dehugaon News : राधिका फरकाटे ठरल्या ‘खेळ रंगला पैठणी’च्या मानकरी

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण : कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : देहूगावातील सामाजिक कार्यकर्त्या रसिका स्वप्निल काळोखे यांच्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या वतीने विठ्ठलवाडी येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणी’चा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये राधिका फरकाटे यांनी विजेतेपद पटकावले. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पत्नी सारिका भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, सरपंच पूनम काळोखे, प्रसिद्ध कीर्तनकार सुप्रियाताई साठे -ठाकूर पाटील, भाजप मावळ महिला आघाडीच्या सुनेत्रा जाधव, ग्रा. पं. सदस्य लीलाताई काळोखे, कीर्तनकार गौरीताई सांगळे आदी उपस्थित होत्या.

‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यातील 200 महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यामध्ये राधिका फरकाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

तर दिपाली काळोखे आणि जगताप ताई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे मानाची पैठणी व कोल्हापुरी साज, मिक्सर, फॅन आदी बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, मानसी गायकर, विद्या शेलार या लकी विनर ठरल्या.

देहूगावचे माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे यांच्या कुटुंबियांच्या वतीने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना भक्ती शक्ती शिल्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी प्राजक्ता गायकवाड यांची मुलाखत घेतली. अभिनय क्षेत्रातील प्रवास, प्रसंग आणि महाराणी येसूबाई यांचा इतिहास प्राजक्ता गायकवाड यांनी उलगडवला. प्रसिद्ध कीर्तनकार सुप्रियाताई साठे-ठाकूर पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वप्निल काळोखे आणि रसिका काळोखे यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.

या वेळी डॉ. लीना सोनवणे, कुमारी शामराव मरगज या महिलांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र वारकरी महामंडळ विश्वस्त जालिंदर महाराज काळोखे, सरपंच विकास ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, शिवसेना देहूरोडशहर संघटक संदीप गोंटे, मावळ तालुका युवा सेनेचे विशाल दांगट आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन ॲड. शुभम गाडगे, सत्यवान सहाणे यांनी केले. तर आभार स्वप्निल काळोखे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.