Dehuroad News : ‘कॅंटोन्मेंटच्या मिळकतकरासह पाणी उपकरात 50 टक्के सवलत द्या’

बोर्ड उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे आणि नगरसेवक रघुवीर शेलार यांची मागणी

एमपीसीन्यूज : गेल्या 10-11 महिन्यांपासून देशासह संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा सामना करावा लागला आहे. या जीवघेण्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींचे व्यववसाय बंद पडले आहेत. अनेकजण मर्यादित स्त्रोतांनी जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या मिळकत कर आणि पाणीपट्टीत 50 टक्के सवलत देण्याची मागणी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे आणि नगरसेवक रघुवीर शेलार यांनी केली आहे.

यासंदर्भात नाईकनवरे आणि शेलार यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे.

कोरोना संकटामुळे उद्भवलेला परिस्थितीची माहिती निवेदनाच्या माध्यमातून सीईओ हरितवाल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांचा रोजगार हिरावून नेला आहे. असे नागरिक जगण्याचा संघर्ष करीत आहेत.

त्यामुळे यंदाच्या वर्षी कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांचा मिळकतकर आणि पाणीपट्टी या दोन्ही करांमध्ये 50 टक्के सवलत द्यावी. तसेच हे दोन्ही कर तिमाही हफ्त्यांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाईकनवरे आणि शेलार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.