Pune News : हॅपी कॉलनी, गोसावी वस्तीत पोलीस चौकी उभारा; चंद्रकांत पाटील यांची मागणी

एमपीसी न्यूज – कोथरुड मतदारसंघातील हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील नागरिक काही असामाजिक तत्वांमुळे त्रस्त झाले असून तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत हॅपी कॉलनी फेडरेशनचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

शिष्टमंडळाच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी तेथील नागरिकांचे गाऱ्हाणे मांडले व तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी प्रकर्षाने मांडली. या चौकीसाठी आम्ही त्वरित जागा उपलब्ध करून देऊ असे स्थानिक नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.