Chinchwad Crime News : बिजलीनगरमध्ये दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बिजलीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आली.

रेणुका रघुनाथ कुलकर्णी (वय 25, रा. बळवंतनगर, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांचे घर शनिवारी सकाळी बारा ते रविवारी सकाळी अकरा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून पाच तोळे वजनाचे एक लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.