Dighi Crime News : कंपनीच्या आवारातून साडेतीन लाखांची तांब्याची केबल चोरीला

एमपीसी न्यूज – दिघी बोपखेल येथील कोकबन ऑटोमेशन कंपनीच्या गोडाऊनच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख साठ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरून नेली. ही घटना 13 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत एक महिन्यानंतर 15 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल तुलशीराम डहाके (वय 30, रा. हडपसर, पुणे) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी बारा एप्रिल रोजी सकाळी सात ते 13 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत दिघी बोपखेल येथील कोकबन ऑटोमेशन या कंपनीच्या गोडाऊनच्या आवारातून टाटा कम्युनिकेशन लिमिटेड येथे असलेली आठ कोअरची तांब्याची केबल चोरून नेली. ही केबल नऊ ड्रममध्ये ठेवण्यात आली होती. या केबलची लांबी साडेचार हजार मीटर असून तीन लाख 60 हजार रुपये एवढी या केबलची किंमत आहे. दिघी पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.