Chakan Crime News : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ; मागासवर्गीय असल्याने लग्नास नकार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका इसमाने लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर महिला मागासवर्गीय असल्याचे कारण देत त्याने लग्नास नकार दिला. जुन 2009 ते 16 मे 2021 दरम्यान चाकण परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

संतोष रामदास शिवेकर (वय 29, रा. करंजविहिरे, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरेपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.18) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक आत्याचार केले. महिलेने लग्नासाठी विचारणा केल्यावर आरोपीने महिला मागासवर्गीय असल्याचे कारण देत लग्नास नकार दिला. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 376 व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अधिक तपास चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.