Kalewadi News : किराणा दुकानातून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला
एमपीसी न्यूज – किराणा दुकानाचे शटर उचकटून 3.94 लाखाचा किराणा माल चोरीला गेला आहे. शिवाजी चौक, काळेवाडी येथे 27 ते 28 जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली.
सुजाराम वेनाराम सिरवी (वय 38, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून किराणा दुकानातील 3 लाख 13 हजार रुपयांचा माल व 80 हजार रुपये ट्रॅन्झॅक्शन द्वारे घेऊन 3 लाख 93 हजार 409 रुपयांचा चोरी केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.