Maval Corona News : नवीन 67 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,907 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,074 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,543 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,524रुग्ण तर ग्रामीण भागात 14,245 रुग्ण आढळून आले आहेत.एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.81 टक्के आहे तर मृत्यू दर 1.65 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 262 लोणावळा नगरपरिषदमध्ये 28 वडगाव नगरपंचायतमध्ये 09 ग्रामीण भागात 191असे एकूण 490 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.