Ind Vs WI ODI : एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी, वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून विजय

एमपीसी न्यूज – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आहे.  भारतीय संघाने सहा गडी राखून 28 षटकांत 177 धावांचे लक्ष गाठले. कर्णधार रोहित शर्माने महत्वपूर्ण 60 धावांचे योगदान दिले.

कर्णधारपदाची धुरा सांभाळ्यानंतर रोहित शर्माची पहिलीच मालिका आहे. भारताचा हा 1,000 वा एकदिवसीय सामना होता. या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चहल आणि वॉशिंग्टन यांच्या फिरकीपुढे विंडीज संघ 176 धावांत ढेर झाला. वेस्ट इंडिज कडून जेसन होल्डरने सर्वाधिक 57 धावा काढल्या. जेसन व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मोठी धावा संख्या उभारू शकला नाही. कर्णधार कायरन पोलार्ड तर भोपळा देखील फोडू शकला नाही. भारताकडून चहलने 49 धावांत 4 बळी घेतले. तर सुंदरने 3 बळी घेतले. प्रसिध कृष्णाला 2 बळी मिळाले.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात चांगली झाली कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरूवात करत 51 चेंडूत 60 धावा केल्या. 14 व्या षटकात रोहित जोसेफच्या चेंडूवरती पायचीत झाला. त्यानंतर कोहली आणि किशन यांची जोडी फार काळ मैदानात टिकू शकली नाही. कोहली अवघ्या 8 धावा करून बाद झाला. पंत (11) किशन (28), सूर्यकुमार यादव (34) आणि दिपक हुड्डा (26) यांनी संघाला विजय मिळवून दिला. विडींजकडून जोसेफने 2 होसेन याने 1 बळी घेतला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.