Pune News : सूर्यदत्त ग्रुपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवनगौरव पुरस्कार

एमपीसी न्यूज – सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिला जाणारा ‘सुर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-2022’ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक व स्कार्फ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या 24 व्या वर्धापनदिनाचे  औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते गडकरी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार प्रकाश आवाडे, ‘सूर्यदत्त’मधील रोशनी जैन, योगिता गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की, ‘शिक्षण ही एक मुलभूत आणि मौल्यवान संपत्ती आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचला पाहिजे. त्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे. याकरिता सर्वच संस्थांनी प्रयत्न केला पाहिजे. आयातीपेक्षा निर्यात कसे वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्वांकरिता दिशा ठरवून, योग्य मार्गाने, गांभीर्याने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.