Pune News: सराईत गुन्हेगाराच्या घरातून तब्बल 125 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यू: लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एका सराईत गुन्हेगारांच्या घरातून पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीचा तब्बल सव्वाशे किलो गांजा जप्त केला आहे. कैलास साहेबराव पवार (वय 35, रा. गडदेवस्ती डोंगरगाव, लोणीकंद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने 2020मध्ये केलेल्या कारवाईतील तो आरोपी आहे. तेव्हापासून तो पसार होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील वॉन्टेड असणारा कैलास पवारने त्याच्या घरात गांजा बाळगून ठेवला असून तो लपून छपून गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून तपासणी केली असता त्यांना मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. त्याच्या घरातून 25 लाख 75 हजार रुपयांचा 128 किलो 765 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तर, एक कार, रोकड व इतर ऐवज देखील जप्त केला आहे. त्याला अटककरून चौकशी करण्यात आली.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने 2020 मध्ये यवत परिसरात काही जणांना अमली पदार्थ विक्रीत पोलीसांनी पकडले होते. त्यानंतर कैलास पवार पसार झाला होता. त्याला वॉन्टेड घोषीत करण्यात आले होते. त्यावेळी पुणे पोलीसांना माहिती मिळाली आणि त्याला पकडण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण पोलीसांना कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.