Maharashtra Corona Update : आज दहा हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद, 66 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात दहा हजारांहून कमी म्हणजेच 9,666 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 03 हजार 700 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 38 हजार 611 जण बरे झाले आहेत. आज 25,175 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 96.60 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 66 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 074 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 18 हजार 076 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यात आजवर 7 कोटी 55 लाख 54 हजार 798 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,394 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 7,24,722 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.