Youth arrested: ताथवडे येथून कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणास अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 11) दुपारी ताथवडे येथे करण्यात आली.

अभिषेक अमीरदास यादव (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुखदेव गावंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC: नवीन जिजामाता, थेरगाव, भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील ‘ओपीडी’त वाढ; YCMH वरील ताण हलका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा डांगे चौक ते ताथवडे रोडवर ताथवडे येथे शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कारवाई करून पोलिसांनी अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये किमतीचा कोयता आढळून आला. पोलिसांनी कोयता जप्त करत अभिषेक याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.