Wadaki Fire : वडकी येथे चप्पल व बूटचे गोडाऊन जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकी परिसरात सासवड (Wadaki Fire) रोडवरील जिंदाल ट्रेडिंग या चप्पल व बुटाच्या कंपनीच्या गोडाऊनला आग लागली होती. यामध्ये पूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच सुमारे दहा हजार स्केवर फुट आरसीसी बांधकाम असलेल्या गोडाऊनमधे आग लागल्याचे जवानांनी पाहिले. यावेळी होज पाईपचा वापर करीत चौफेर पाण्याचा मारा सुरू करुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. या ठिकाणी समोरील बाजूस आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात असल्याने मागील बाजूकडील भिंतीचा काही भाग जेसीबीच्या साहाय्याने पाडून बीए सेटचा (श्वसन उपकरण) परिधान करुन जवानांनी गोडाउनच्या आत प्रवेश करीत कोणी कामगार अडकला आहे का याची खातरजमा केली.

गोडाऊनमध्ये कोणी नसल्याने या घटनेत जखमी वा (Wadaki Fire) जिवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवळपास तासभर लागला असून आग पहाटे चार वाजता पुर्ण विझल्याचे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आग मोठी असल्याने पाण्याचा अतिरिक्त वापरासाठी जवळच असलेल्या विहिरीतून पाणी उपलब्ध झाले. तसेच, सुमारे 20 खाजगी वॉटर टँकर याठिकाणी वापरण्यात आले. तसेच, काळेपडल अग्निशमन केंद्र, हडपसर अग्निशमन केंद्र, कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहने व कोंढवा बुद्रुक व पीएमआरडीए येथील जम्बो टँकर यांचा वापर करण्यात आला.

Youth arrested: ताथवडे येथून कोयत्यासह तरुणाला अटक

आगीमधे विविध कंपन्याची पादत्राणे (चप्पल, बुट, सँडल) व इतर काही साहित्य पुर्ण जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोडाऊनच्या फरशा, भिंत व सिलिंग निखळून पडले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

ही कारवाई दलाचे सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ड्युटी ऑफिसर अनिल गायकवाड, प्रमोद सोनावणे व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे आणि वाहन चालक राजु शेख, दिपक कचरे, जगताप व जवान अनिमिष कोंडगेकर, बाबा चव्हाण, प्रताप फणसे, निलेश लोणकर, किसन नरके, रवि बारटक्के यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.