Todays’s Horoscope 26 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Todays’s Horoscope 26 November 2022
वार – शनिवार.
26.11.2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- मूळ 14.58 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
चंद्र राशी – धनु.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही. नवे उपक्रम सगळे उद्यावरच ढकला. पती-पत्नी मधील वादावर आज मौन हा रामबाण उपाय ठरेल.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )
कार्यक्षेत्रात वावरताना आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्वगुणास वाव मिळेल. पत्नीस आज योग्य सल्ले देईल.

कर्क (शुभ रंग- कर्क.)
ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणींसाठी अतिव्यस्त दिवस असून आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी.

सिंह (शुभ रंग- जांभळा)
नोकरदार वरिष्ठांच्या लहरी सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज अत्यंत आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे विना व्यत्यय पार पडतील. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल. कलेच्या क्षेत्रातील नवोदिताना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपूनच करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)
आज कोणत्याही कामातील तुमचा उत्सव दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.

धनु- (शुभ रंग- जांभळा )
महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर ठाम राहल अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता असू द्या. वाद टाळून सुसंवाद साधलेला बरा.

मकर ( शुभ रंग- आकाशी )
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातूनच मनशांती मिळणार आहे.

कुंभ (शुभ रंग – लाल)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

मीन (शुभरंग- मोतिया)
आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. अधिकारांचा गैरवापर टाळून कायद्याच्या चौकटीतच काम करा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.