Talegaon Dabhade : विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या पत्रकारांचा गौरव

एमपीसी न्युज – महाराष्ट्र प्रदेश पोल्ट्री संघटनेच्या संघटकपदी पत्रकार संघाचे सचिव सोनबा गोपाळे गुरुजी यांची निवड झाली. तसेच पत्रकार प्रभाकर तुमकर हे इंद्रायणी महाविद्यालयातून एम ए मराठी (प्रथम वर्ष)ची परीक्षा विशेष प्रविण्यासह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले, याबद्दल दोघांचा तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाकडून सन्मान करण्यात आला. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या अंबर कार्यालयामध्ये झालेल्या मासिक बैठकी दरम्यान हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे संस्थापक सुरेश साखवळकर, अध्यक्ष मनोहर दाभाडे, खजिनदार बी एम भसे गुरुजी, अतुल पवार, रामदास वाडेकर, प्रेस फोटोग्राफर श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.

पत्रकार संघाचे सचिव गोपाळे गुरुजी यांनी मावळ तालुक्यामध्ये पोल्ट्री संघटनेची स्थापना करून या व्यवसायातील व्यावसायिकांना प्रेरणा दिलेली आहे. ते मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे संघटक म्हणून काम करत असताना मध्यंतरी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना महाराष्ट्र प्रदेश पोल्ट्री संघटनेच्या संघटकपदी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

River Cyclothon : इंद्रायणी स्वच्छता अभियानाअंतर्गत रिव्हर सायक्लोथॉन रविवारी होत असल्याने वाहतुकीत बदल

प्रभाकर तुमकर हे वारंगवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व एमपीसी न्यूज मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. वयाची पन्नाशी पार असलेले तुमकर हे इंद्रायणी महाविद्यालयातून एम ए मराठी प्रथम क्रमांकाने विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. या वयामध्ये त्यांनी केलेला अभ्यास व मिळालेले यश हे निश्चितच पत्रकार संघाला प्रेरणादायी आहे असे मत संस्थापक सुरेश साखवळकर यांनी मत व्यक्त केले.

या दोन्ही मान्यवरांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांच्या भविष्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाची मासिक मीटिंग सुरू होण्याअगोदर तळेगाव शहर पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कै. ॲड. विश्वनाथ जयवंतराव दाभाडे तसेच प्रगतशील शेतकरी कै.सतीश केशवराव वाळुंज यांना पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.