शिवसेना उमेदवार सचिन भगत यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या कुटूंबीयाला मारहाण केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – माहिती अधिकाराचे काम करत असल्याच्या कारणावरून एका कुटुंबातील दोन महिलांना मारहाण केल्या प्रकरणी  वडगावशेरीतील शिवसेना पक्षाचे उमेदवार यांच्यासह 40 ते 50 जणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी वडगावशेरी येथील आनंदपार्क, क्रांतीनगर येथे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याप्रकरणी कमल आशिष माने (वय-34, रा.आनंदपार्क, क्रांतीनगर, वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून सचिन भगत, साधना भगत, शुभदा भगत यांच्यासह त्यांच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कमल माने हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. हे काम का करत आहात. या कारणास्तव आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादींच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या सासूला मारहाण केली.

 

यापूर्वीही सचिन भगत यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत आचारसंहितेचे व्हिडिओ शुटिंग करणा-या एकाला मारहाण करत कॅमेरा फोडला होता. त्यावेळी नगरसेवक सचिन भगत, (गणेश नगर वडगावशेरी), अक्षय इंदलकर, क्षीरसागर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.