सुट्टीच्या दिवशीही स्वच्छतागृह चालू राहण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात आंदोलन

एमपीसी न्यूज – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशीही स्वच्छतागृह सुरू रहावे, या मागणीसाठी विद्यार्थींनींनी सोमवारी (दि. 6) महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन केले.

या आंदोलनाला विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यापूर्वी विनंती करूनही विद्यार्थीनींच्या अडचणीवर उपाययोजना केल्या नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते.

कॉलेजमधील वाडिया ग्रंथालय हे दर रविवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू असते. या काळात अनेक मुली महाविद्यालयात अभ्यासासाठी येत असतात. मात्र, स्वच्छतागृह बंद असल्याने विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे.  ‘राईट टू पी’ यासाठी शेवटी हे पाऊल उचलावे लागत असल्याची खंत विद्यार्थिनींकडून व्यक्त केली जात आहे. मागिल सहा महिने या विद्यार्थींनी प्राचार्यांकडे स्वच्छतागृह सुरू करावे यासाठी विनंती करत होत्या. मात्र, त्याची कोणतीही दखल न घेतल्याने तब्बल पाचशे विद्यार्थिनींनी सह्यांचे निवेदन देत आंदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.