Today’s Horoscope 14 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 14 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – गुरुवार.
तारीख – 14.03.2024.
शुभाशुभ विचार – वैधृती वर्ज्य दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – भरणी 16.56 पर्यंत नंतर कृतिका.
चंद्र राशी – मेष 22.40 पर्यंत नंतर वृषभ.
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही आपल्याच धुंदीत आपल्याच मस्तीत असाल. इतरांवर हुकूमत गाजवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. एखादा शेरास सव्वाशेर ही भेटू शकतो. वाणीत गोडवा गरजेचा आहे.
वृषभ – ( शुभ रंग- निळा)
दिवसच खर्चाचा असल्याने कंजुषपणा काहीच कामाचा नाही. आज काही अनपेक्षित खर्च दार ठोठावणार आहेत. काही आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे राहील.
मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)
पूर्णपणे अनुकूल असलेला हा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील. रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीला प्राधान्य देणे हिताचे.
कर्क – (शुभ रंग – चंदेरी)
वेळेचे योग्य नियोजन करून आज फक्त आपल्या कामाला प्राधान्य द्या. मित्रमंडळींना आज लवकर फुटवा. काही अडचणी वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटू शकतील.
सिंह -( शुभ रंग – हिरवा)
नवीन व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. चिंता करू नका. आज दैव तुमच्या बाजूने आहे. आज मात्र कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.
कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात उगीच डोकावू नका. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. जोडीदाराला दिलेला शब्द पाळणे हिताचे राहील. आज कोणतेच धाडस नको.
तूळ- ( शुभ रंग- गुलाबी)
व्यावसायिक असाल तर स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. बेरोजगार असाल तर आज नोकरीसाठी काही संधी चालून येतील. पत्नीचे सल्ले डावलू नका.
वृश्चिक – ( शुभरंग – पांढरा)
नोकरीच्या शोधात असाल तर आज काही चांगल्या संधी चालून येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घेणे गरजेचे आहे.
धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील. छान दिवस आहे.
मकर – (शुभ रंग- भगवा)
बरेच दिवसापासून रखडलेली घरगुती कामे आज मार्गी लागतील. प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार मनासारखे होतील. तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल.
कुंभ – (शुभ रंग- डाळिंबी)
वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारात अनपेक्षित अडचणी येतील. काही अप्रिय माणसे संपर्कात येतील व न मागता काही सल्ले देतील. ऐकून घ्या व सोडून द्या. व्यर्थ वाद टाळा.
मीन- ( शुभ रंग- मोतिया)
आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याकडे तुमचा कल असेल.
श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424