Pune: भाजपचा उमेदवार जाहीर, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार ? 

एमपीसी न्यूज – भाजपने आज अपेक्षे प्रमाणे माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Pune) यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव काँग्रेसतर्फे आघाडीवर आहे.
त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये (Pune)सुरू आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचेही नावे चर्चेत आहेत.
येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही तातडीने उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. धंगेकर हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

काँग्रेस भवनमध्ये झालेल्या मेळाव्यात पुण्याचा खासदार ह आमच्याच पक्षाचा असेल आणि केंद्रात सत्ताही मिळणार असल्याचा दावा पटोले यांनी केला होता. या मेळाव्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. या मेळाव्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी  केली होती.

 

 

 

Pune: मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार 

 

आपण कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होणार आहे. पक्षाने आपल्याला संधी द्यावी, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.