RTO News : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मे महिन्यात पक्क्या ( RTO News ) अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 2 व 3 मे, मंचर येथे 6 व 7 मे, जुन्नर येथे 15 व 16 मे, वडगाव मावळ येथे 20 व 21 मे तर लोणावळा येथे 27 व 28 मे या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौरा होणार आहे.

Vadgaon Maval : सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ शनिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्यांना पक्की अनुज्ञप्ती काढायची असेल त्यांनी स्लॉट बुक करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी ( RTO News ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.