Sangli : पलूस कडेगाव पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड निश्चित

एमपीसी न्यूज- पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड झाली.माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत अन्य चार जणांचे अर्ज असून त्याबाबतचे चित्र अजून स्पष्ट झाले नाही. येत्या 28 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या विश्‍वजीत यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे पुढील राजकीय वाटचालीचा महत्वाचा टप्पा असणार आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वातारवण होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे भाजपकडून संग्रामसिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे हे निवडणूक चिरशीची होणार असे वाटत होते.

मात्र अचानकपणे संग्रामसिंह यांनी माघार घेत विश्‍वजीत यांचा मार्ग सोपा केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने विश्‍वजीत यांना पाठिंबा दिला होता. 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.