Pune : पोटच्या मुलीचा विनयभंग करणा-या नराधम बापाला अटक

एमपीसी न्यूज – पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रकार रविवारी (दि. 20) वडारवाडी येथे दुपारी एकच्या सुमारास घडला.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 34 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी महिला काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान त्यांची 14 वर्षाची मुलगी घरात एकटी होती. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत नराधम बापाने तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिला घरी आल्यानंतर झालेला सर्व प्रकार त्यांना समजला. यावरून आरोपीने पोटच्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.