Talegoan : कामगार नेते रोहिदास गुंजाळ यांचे निधन
एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (मावळ) येथील कामगार नेते रोहिदास वामनराव गुंजाळ(वय 68)यांचे निधन झाले.चिंचवड येथील एक्साईड बॅटरी कंपनीत त्यांनी सुमारे 30 वर्षे कामगारांचे नेतृत्व केले. त्यांच्या मागे मुलगे,दोन मुली,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे. तळेगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुण पवार यांचे ते मेहुणे तर उद्योजक संतोष गुंजाळ यांचे ते वडील होते.