Nigdi : भक्‍ती-शक्‍ती चौकाचे पर्यटन मानांकन वाढविण्यासाठी ध्वनी व प्रकाश योजना करणार

दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली पाहणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्‍ती-शक्‍ती चौकाचे पर्यटन मानांकन वाढविण्यासाठी प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांची माहिती , शहराचा संपूर्ण इतिहास याची माहिती दिली जाणार आहे. याचे काम दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून करुन घेण्याचे नियोजित आहे.

महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. सुमारे 50 टक्के पुलाचे पूर्ण झाले आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्‍ती-शक्‍ती चौकाचे पर्यटन मानांकन वाढविण्यासाठी प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्याकरिता दिग्दर्शक नितीन देसाई यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह या चौकाचा संयुक्त पाहणी दौरा केला.

या चौकातील महापालिकेच्या वाहतूक नियोजनाचा आराखडा देसाई यांना सादर करण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी परिवहन कक्षाला दिल्या आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास करून, पर्यटन मानांकन वाढविण्यासाठी प्रभावी ध्वनी व प्रकाश योजना तयार केली जाणार आहे.

यावेळी नितीन देसाई यांच्यासबोत त्याची टीम, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेन जुंधारे, एकनाथ पाटील, उपअभियंता विजय भोजने, उड्डाणपुलाच्या कामाचे सल्लागार राहुल गायकवाड, बी.जी.शिर्के ठेकेदाराचे प्रतिनिधी अनिल बर्गे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.