Hinjawadi : शिवशाहीच्या धडकेत टेम्पो चालक ठार

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसच्या धडकेत टेम्पोचालक ठार झाला. ही घटना बुधवारी पहाटे मुंबई बंगलोर महामार्गावर घडली.

अजय सिंग असे मृत्युमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. सागर अमरजित पवार (वय 35, रा. दत्तनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव रामचंद्र नलावडे (वय 34, रा. पिटवे वाटी, ता. जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगलोर महामार्गावरील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यारा दी हवेली या हॉटेलसमोर पंक्‍चर झालेल्या टेंपोचे (एम एच 14 / जीओ 8150) काम सुरू होते. त्यावेळी शिवशाही बस (एम एच 47 / वाय 2461) चालकाने भरधाव वेगात बस चालवून अजय सिंग यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार पराळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.